Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सुखी माणसाचा सदरा मालिकेचे १०० भाग पूर्ण !


 

मुंबई १६ फेब्रुवारी, २०२१ : लहानपण देगा देवामुंगी साखरेचा रवा’ लहानपण विचारात नाही तर आचरणात असावं लागतं. आपली कुवत ओळखून ती स्वीकारता आली की मग जगण्यातील सहजता वाढते आणि आयुष्याचा प्रवास सुखकर होतो... साखरेच्या एका दाण्यावर मुंगी खुश असतेम्हणजेच अल्पसंतुष्टी हे जीवनातील आनंदाचं गमक आहे हे ती सांगून जाते... आपण नेहेमीच ऐकतो सुखी माणसाचा सदरा हा प्रत्येकालाच हवा असतो पण तो दुर्मिळ नाहीप्रत्येक माणूस तो त्याच्याकडे असलेल्या धाग्यांमधून विणू शकतो.. आणि हेच गमक आचारणात आणून आपलं आयुष्य जगणारे चिमणराव आणि त्यांचं सुखी कुटुंब दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलं... केदार शिंदे निर्मित आणि दिग्दर्शित या मालिकेने खूप कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकली. केदार शिंदे यांनी या मालिकेद्वारे छोट्या पड्यावर पुनरागमन केले तसेच महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणजेच भरत जाधव यांना मालिकेद्वारे रसिक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे... याचसोबत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडीश्रुजा प्रभुदेसाईमालिकेतील मोरू मैना यांनी देखील प्रेक्षकांची मने जिंकली... बघता बघता मालिकेने १०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. आजवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच हे होऊ शकले यात शंका नाही...

मालिकेतील सगळ्या कलाकारांनीमालिकेच्या संपूर्ण यूनिटने हा क्षण खूप उत्साहात आणि आनंदात साजरा केला...  केक कट केलासेल्फी देखील काढला... तेंव्हा बघत रहा सुखी माणसाचा सदरा सोम ते शनि रात्री १०.३०वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Yorum Gönder

0 Yorumlar